ठाणे : राहुल गांधींना 12 जून रोजी भिवंडी कोर्टात हजर राहण्याचे आदेश

Continues below advertisement
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना १२ जूनला भिवंडी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिलेत.
लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचारावेळी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राहुल गांधींवर भिवंडीच्या सेशन कोर्टात सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी निकाल देण्यापूर्वी कोर्ट राहुल गांधींचा जबाब नोंदवणार आहे. यासाठी राहुल यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले, मात्र राहुल गांधींनी अनुपस्थिती लावल्यानं कोर्टानं आता १२जूनची अंतिम तारीख दिली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर महात्मा गांधींची हत्या केल्याचा आरोप राहुल यांनी केला होता.
याविरोधात संघाचे राजेश कुंटे यांनी न्यायालयात मानहानीचा दावा केला होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram