ठाणे : इमारत धोकादायक झाल्याने सिव्हिल हॉस्पिटलचं लवकरच स्थलांतर

ठाण्यातलं जिल्हा रुग्णालय म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटलचं लवकरच स्थलांतर केलं जाणारेय. सिव्हिल हॉस्पिटलची सध्याची इमारत धोकादायक बनली आहे.  त्यामुळं लवकरात लवकर दुसरी पर्यायी जागा शोधण्याचं काम आरोग्य विभागानं हाती घेतलंय. सिव्हिल हॉस्पिटलची सध्याची इमारत ब्रिटिशकालीन असून १९३५ साली तिचं बांधकाम करण्यात आलं होतं. मात्र आता ही इमारत जीर्ण झाली असून ठाणे महापालिकेनंही तिचा समावेश धोकादायक इमारतींच्या यादीत केलाय. त्यातच मागील काही दिवसांत स्लॅब कोसळणं, सज्जे कोसळणं असे प्रकार रुग्णालयात घडू लागलेत. यामुळं आता सिव्हिल हॉस्पिटलच्या स्थलांतराच्या हालचालींना वेग आलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola