ठाणे : अंबरनाथ शहराची तहान भागवणाऱ्या चिखलोली धरणात गंधक

Continues below advertisement
अंबरनाथ शहराची तहान भागवणाऱ्या चिखलोली धरणाच्या पात्रात गंधक आढळून आलंय. त्यामुळं हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल प्रयोगशाळेनं दिलाय. चिखलोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एमआयडीसीतल्या रासायनिक कंपन्या सांडपाणी आणि रासायनिक कचरा टाकत असल्याचा प्रकार मागील वर्षी एबीपी माझाने समोर आणला होता. याबाबत वारंवार तक्रारी केल्यानंतर अखेर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि प्रदूषण नियंत्रण मंडळानं चिखलोली धरणातल्या पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले. आणि आता या तपासणीत हे धक्कादायक वास्तव समोर आलं. त्यामुळं यानंतर तरी यंत्रणेचे डोळे उघडावेत आणि धरणं नासवणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई व्हावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होतेय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram