ठाणे : सीडीआर प्रकरणात आतापर्यंत कुणाकुणाला अटक?
Continues below advertisement
सीडीआर प्रकरणातील मुख्य सूत्रधार सौरव साहू याला ठाणे क्राईम ब्रांचकडून अटक करण्यात आली आहे. साहूला दिल्लीतून रविवारी रात्री अटक करण्यात आली. सीडीआर प्रकरणात आतापर्यंत अटक केलेल्या सर्व आरोपींना साहू यानेच सीडीआर काढून दिले होते. यापूर्वी २०१६ मध्ये दिल्ली क्राईम ब्रँच, २०१७ मध्ये मुंबई क्राईम ब्रँचने त्याला अटक केली होती. त्यानंतर आता ठाणे क्राईम ब्रँचने साहूला अटक केली आहे. सीडीआर म्हणजे कॉल डिटेल रेकॉर्ड प्रकरणात नागरिकांचे कॉल रेकॉर्ड गुप्तपणे काढले जात आणि ज्यांना हे रेकॉर्ड हवे असतात त्यांना विकले जातात. सीडीआर प्रकरणी देशातील पहिली महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं होतं.
Continues below advertisement