ठाणे : CDR लीक प्रकरण : पोलिसांकडूनच गुप्तहेरांना सीडीआरची विक्री
कॉल रेकॉर्ड प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ साहु याची माहिती आणि फोटो आमच्या हाती लागलाय. सौरभ साहु सध्या फरार आहे. सौरभ साहु पोलिसांच्या मदतीने सीडीआर खरेदी करुन अटकेतील आरोपींना विकत असल्याची माहिती आहे. एका नंबरच्या सीडीआरची किंमत 10 ते 12 हजार रुपये, तर व्हिआयपी नंबरच्या सीडीआरची किंमत लाखात असायची. सौरभ साहुला यापूर्वी मुंबई क्राईम ब्रांच आणि दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. यावेळी राजस्थान आणि अन्य राज्यातील पोलिसांमार्फत तो सीडीआर मिळवायचा अशी माहितीही त्याने दिली होती. या प्रकरात जयपूर पोलिसातील एका पोलिस उप निरीक्षकालाही निलंबीत करण्यात आलं होतं.