ठाणे : कुप्रसिद्ध सट्टेबाज सोनू जालानला बेड्या

Continues below advertisement
भारतातील सट्टा बाजारातील मोठे नाव असलेला कुप्रसिद्ध सट्टेबाज सोनू जालान याला ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. अल जझीरा या परदेशी वृत्तवाहिनीने कथित स्टिंग ऑपरेशनद्वारे भारताने क्रिकेट कसोटी सामने फिक्स केल्याचा दावा केला होता. त्यामुळे क्रिकेट क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर सोनू जालानची अटक ही पहिली कारवाई असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरु आहे. यात अनेक धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता पोलिस सुत्रांकडून वर्तवण्यात येत आहे. सोनू जालान हा मुंबईच्या सट्टा बाजारातील मोठा सट्टेबाज असून त्याचे परदेशात अनेक ग्राहक आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram