ठाणे : दुरुस्तीच्या कामांसाठी मुंब्रा बायपास दोन महिन्यांसाठी बंद राहणार
Continues below advertisement
जेएनपीटीमधून येणाऱ्या जड वाहतुकीसाठी तसंच, कल्याण, नवी मुंबई, डोंबिवली यांना ठाणे शहराशी जोडणारा मुंब्रा बायपास काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दोन महिने हा बायपास दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येईल. 16 एप्रिलपासून या कामाला सुरुवात होणार आहे. मुंब्रा बायपासवर पडलेल्या खड्ड्यांमुळे इथं अनेकदा अपघात होतात. तसंत या रस्त्या खालून मध्य रेल्वे जाते तो ब्रीज अत्यंत धोकादायक झाल्यानं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे.
Continues below advertisement