ठाणे : नवजात बालकांना विकणारी 8 जणांची टोळी गजाआड
Continues below advertisement
अनैतिक संबंधातून किंवा अत्याचारातून जन्मलेल्या बाळाची विक्री करणाऱ्या 8 जणांच्या टोळीला अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या टोळीत सहा महिला आणि 2 पुरूष आहेत. या टोळीकडून 2 बालकांची सुटका करण्यात आली. ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेनं ही कारवाई केली असून सोलापूरमधील राखी बाबरे ही या टोळीची सूत्रधार आहे. झोपडपट्टीतील पीडित महिलांना हेरण्यासाठी टोळीनं हस्तक नेमले होते. शिवाय मुख्य आरोपी राखी ही कंत्राटी पद्धतीनं सरोगसी स्वीकारत असल्याचंही तपासात उघड झालं आहे. आरोपींना 3 आॅक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
Continues below advertisement