Thane Tree Cutting | ठाण्यातील 3527 झाडांच्या कत्तलीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती | ठाणे | ABP Majha
ठाण्यातील 3 हजार 527 झाडांच्या कत्तलीला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. नियम धाब्यावर बसवून ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने सर्रासपणे वृक्षतोडीची परवानगी दिल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेची दखल घेत हायकोर्टाने ठाणे महापालिकेला दणका दिला आहे. ठाण्यातील पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी झाली.