थायलंड : थायलंडमध्ये गुहेत अडकलेल्या फुटबॉलपटूंना वाचवलं, किर्लोस्कर पंपाची मोठी मदत
Continues below advertisement
थायलंडमधील गुहेमध्ये अडकलेल्या सर्व फूटबॉलपटूंना अखेर सुखरुप बाहेर काढण्यात यश आलंय. चियांग राय प्रांतातील एका गुहेत 15 दिवसांपासून फुटबॉल टीम अडकली होती. या टीममध्ये 11 ते 16 वयोगटातील 12 मुलं आणि त्यांचा २५ वर्षांचा प्रशिक्षकदेखील होते. विशेष म्हणजे या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सांगलीतील मराठमोळ्या पथकाचाही मोठा वाटा आहे. या मुलांना बाहेर काढण्यासाठी गुहेतील पाण्याची पातळी कमी करणे अत्यंत आवश्यक होते. त्यामुळे थायलंड सरकारने भारत सरकारला विनंती करून किर्लोस्कर ब्रदर्सचे फ्लडपंप्स पाठवण्यास सांगितले. किर्लोस्कर कंपनीने डिझाईन प्रमुख प्रसाद कुलकर्णी यांची टीम तातडीने शुक्रवारी रात्री थायलंडला रवाना केली. थायलंडला पोहोचताच या टीमने कामास सुरूवात केली आणि फ्लड पंप्स सुरू केले. पाण्याचा उपसा केल्यामुळे गुहेतील बचावकार्याला गती आली आणि 13 जणांना बाहेर काढणे शक्य झाले,
या मदतीबद्दल थायलंडचे भारतातील राजदूत गोंगस्काडी यांनी ट्वीटरवरुन थँक्यू इंडिया असे ट्वीट केले.
या मदतीबद्दल थायलंडचे भारतातील राजदूत गोंगस्काडी यांनी ट्वीटरवरुन थँक्यू इंडिया असे ट्वीट केले.
Continues below advertisement