चहा विक्रेत्याचा अनोखा विक्रम, महिन्याला तब्बल 12 लाख उत्पन्न
Continues below advertisement
पुण्यात एका चहा विक्रेत्यांचं महिन्याचं उत्त्पन्न ऐकून अनेकांना धक्का बसेल. कारण, हे चहा विक्रेते महिन्याला तब्बल 12 लाख रुपये कमावतात. नवनाथ येवले असे या चहा विक्रेत्यांचं नाव असून, ते पुण्यात येवले टी हाऊस नावाने चहा विकतात.
त्यांच्या येवले टी हाऊसचे सध्या पुण्यात तीन स्टॉल असून, प्रत्येक टी हाऊसमध्ये 12 लोक काम करतात. त्यांच्या चहाच्या चवीमुळे येवले टी हाऊस हे सर्वच चहाप्रेमींचे आवडीचे ठिकाण बनले आहे. अनेक पुणेकर या टी हाऊसला भेट देऊन, चहाचा अस्वाद घेतात.
नवनाथ येवले यांनी एनआयला दिलेल्या प्रतिक्रियेत येवले टी हाऊसचा ब्रँड संपूर्ण जगभरात पोहोचवायचा असल्याचं सांगितलं आहे. तसेच, “पकोडे विकून जितका रोजगार उपलब्ध होतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात चहा विकून रोजगार मिळत असल्याचं,” त्यांनी स्पष्ट केलं.