तामिळनाडू : हिंसक आंदोलनातील पोलिसांच्या गोळीबारात 11 जणांचा मृत्यू
Continues below advertisement
चेन्नई : तामिळनाडूतील तूतीकोरीन शहरात वेदांता ग्रुपच्या स्टारलाईट कॉपर प्लांटविरोधात तीव्र आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं, ज्यामध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर केला, यामध्येच आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप करण्यात येत आहे.
वेदांता ग्रुपच्या स्टारलाईट कॉपर कारखान्यातून होणाऱ्या प्रदूषणाविरोधात हे आंदोलन आहे. कंपनीच्या विस्ताराचं वृत्त समोर आल्यापासून आंदोलन अधिकच तीव्र होत चाललं आहे. या आंदोलनाला काल अचानक हिंसक वळण लागलं आणि यामध्ये अकरा जणांना आपला जीव गमवावा लागला.