चेन्नई : तामिळनाडूत पोंगलनिमित्त जलिकट्टू खेळाचं आयोजन
Continues below advertisement
पोंगलचा सण साजरा करताना तिकडे तामिळनाडूत जलीकट्टू हा पारंपरिक खेळ रंगला.. तामिळनाडूच्या मदुराईमध्ये या साहसी पारंपरिक खेळाचं ओयजन करण्यात आलं होतं. यावेळी शेकडो तरुणांनी या थरारक खेळात सहभाग घेतला.. पोंगल सणाला खेळल्या जाणाऱ्या या खेळात एक वळू सोडला जातो.. ज्याला चिथावलं जातं.. आणि या चवताळलेल्या वळूला तरुण वश करण्याचा प्रयत्न करतात.. या खेळाला तब्बल 2 हजार वर्षांची परंपरा आहे... खरंतर मागची जवळपास 3 वर्ष न्यायलयाने जलीकट्टू खेळावर बंदी आणली होती.. हा खेळ सुरु करण्यात यावा यासाठी मागच्या वर्षी मोठी आंदोलनं झाली.. त्यानंतर मागच्याच वर्षीपासून हा खेळ पुन्हा सुरु झालाय.
Continues below advertisement