चेन्नई : प्रश्न विचारल्यावर तामिळनाडूच्या राज्यपालांनी महिला पत्रकाराचे गाल थोपटले
Continues below advertisement
तामिळनाडूच्या राज्यपालांनी पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी महिला पत्रकाराचे गाल थोपटले.
तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी, तामिळनाडूच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या सेक्स फॉर डिग्री प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यासाठी, काल पत्रकार परिषद घेतली.
यावेळी 78 वर्षीय राज्यपाल पुरोहित यांना त्यांच्याजवळ उभ्या असलेल्या लक्ष्मी सुब्रमण्यम या महिला पत्रकराने प्रश्न विचारला.
पण प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी पुरोहित यांनी त्या महिला पत्रकाराच्या संमतीविना तिच्या गालाला स्पर्श केला आणि गाल थोपटले. राजभवनात बोलवलेली ही पत्रकार परिषद आटोपून ते निघत असताना ही घटना घडली. यावेळी त्यांच्याभोवती पत्रकारांचा गराडा होता.
लक्ष्मी सुब्रमण्यम ‘द वीक’मध्ये काम करतात. या घटनेनंतर लक्ष्मी यांनी ट्विट करुन “मी बनवारीलाल पुरोहित यांना प्रश्न विचारला त्यावर त्यांनी उत्तर देणे अपेक्षित होते. पण त्यांनी उत्तर देण्याऐवजी माझे गाल थोपटले”, असं म्हटलं.