ड्राईव्हिंग करताना मोबाईलवर बोलणं गुन्हा नाही : केरळ हायकोर्ट
ड्रायव्हिंग करताना मोबाईलवर बोलणं बेकायदेशीर नसल्याचा निर्वाळा केरळ उच्च न्यायलायाने दिला आहे. जोपर्यंत ड्रायव्हिंगमुळे नागरिकांची सुरक्षा धोक्यात येत नाही, तोपर्यंत त्याला बेकायदेशीर म्हणता येणार नाही, त्यामुळे हा गुन्हा नसल्याचं केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं.