'तारक मेहता...'मध्ये डॉ. हाथीची भूमिका साकारणारे कवी कुमार यांचं निधन
सब टीव्हीवरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या लोकप्रिय मालिकेत डॉ. हंसराज हाथीची भूमिका साकारणारे अभिनेते कवी कुमार आझाद यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत त्यांचा मृत्यू झाला. कवी कुमार आझाद अनेक वर्षांपासून या मालिकेत काम करत होते.