मुंबई : पूर्व द्रुतगती मार्गावर स्विफ्ट डिझायरनं पेट घेतला
Continues below advertisement
मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर मुलुंड टोलनाक्यावर एका मारुती स्विफ्ट डिझायरनं पेट घेतला. दुपारी 4 वाजता ही घटना घडली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र संपूर्ण गाडी जळून खाक झाली. चालक ठाण्यावरुन मुंबईकडे येत असताना ही दुर्घटना घडली. मात्र चालक वेळीच गाडीबाहेर पडल्यानं मोठी दुर्घटना टळली.
Continues below advertisement