Kadaknath | महाजनादेश यात्रेच्या रथासमोर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अंडी, कडकनाथ कोंबड्या फेकल्या | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Sep 2019 02:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सांगलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या फेकण्यात आल्या. इस्लामपूरच्या ताकारी-पलूस रोडवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चार ते पाच कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या यात्रेच्या रथापुढे येत कोंबड्या आणि अंडी फेकली. कडकनाथ कोंबडीपालन घोटाळाप्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं.