गुजरातचा रणसंग्राम : नोटाबंदी, जीएसटीचा सुरतवर काय परिणाम?
Continues below advertisement
डायमंड सिटी म्हणून ओळख असलेल्या सुरतमध्ये देशातील सर्वात मोठी हिरे बाजारपेठ आहे. तर कापड उत्पादनातही सुरत काही मागे नाही. देशातल्या मोठ्या बाजारपेठापैकी एक अशी सुरतच्या कापड बाजारपेठेची ओळख आहे. नोटाबंदी, जीएसटीनंतर सर्वच व्यवसायावर परिणाम झाल्याचं पाहायाला मिळालं. निवडणुकीच्या दृष्टीने पाहिलं तर एकट्या सुरतमध्ये 12 विधानसभेच्या जागा आहेत. सध्या त्या भाजपच्या ताब्यात आहेत. मात्र नोटाबंदी,जीएसटीनंतर गुजरातची सुरत नेमकी काय म्हणते पाहूयात...
Continues below advertisement