Surat Fire Tragedy | सूरतमध्ये इमारतीला आग, कोचिंग क्लासमधील 21 विद्यार्थ्यांचा मृत्यू | ABP Majha
Continues below advertisement
गुजरातची आर्थिक राजधानी सूरतमध्ये एका इमारतीमध्ये लागलेल्या आगीत 21 मुलांचा मृत्यू झाला आहे. 20 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला तर एका विद्यार्थ्याचा इमारतीमधून उडी मारल्याने अंत झाला. मृतांमध्ये 18 मुली आणि 3 मुलांचा समावेश आहे. सर्व विद्यार्थ्यांचं वय 15 ते 22 वर्षांपर्यंत होतं. या दुर्घटनेत 11 विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुर्घटनेच्या वेळी आर्ट्स कोचिंग क्लासमध्ये 40 ते 45 विद्यार्थी आणि शिक्षक होते. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. तक्षशिला कॉम्प्लेक्स या इमारतीमध्ये अनेक दुकानं आणि कोचिंग सेंटर आहेत. शुक्रवारी (24 मे) इमारतीच्या चौथ्या मजल्यावर कोचिंग क्लास सुरु होता. त्याचवेळी इमारतीमध्ये आग लागली. आगीत 20 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर जीव वाचवण्यासाठी एका विद्यार्थ्याने चौथ्या मजल्यावरुन उडी मारली, ज्यात त्याचा अंत झाला.
Continues below advertisement