सुरत/ गुजरात : 11 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन हत्या
Continues below advertisement
देशातल्या बलात्काराच्या घटना ह्या काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. कारण, उन्नाव, कठुआनंतर आता गुजरात राज्यातल्या सुरतमध्ये बलात्कार आणि हत्येची घटना घडली आहे. एका ११ वर्षीय मुलीवर आठ दिवस बलात्कार करुन निर्घुणपणे तिची हत्या करण्यात आली. ६ एप्रिलला सूरतमधल्या पांडेसरा भागात एका क्रिकेट ग्राऊंडजवळ या चिमुकलीचा मृतदेह आढळला होता. या घटनेतल्या आरोपींनी क्रोर्याची परिसीमा गाठत मुलीला प्रचंड यातना दिल्याचं तिच्या मृतदेहावरुन लक्षात येतं. कारण या आठ वर्षाच्या मुलीच्या अंगावत 80 पेक्षा जास्त जखमांच्या खुणा दिसत आहेत. पण अजूनही या मुलीची ओळख मात्र पटली नाही. पोलिसांचा याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
Continues below advertisement