कर्नाटकचा सत्तासंघर्ष : हंगामी विधानसभा अध्यक्ष भाजपचेच : सुप्रीम कोर्ट

Continues below advertisement
नवी दिल्ली: कर्नाटक निवडणुकीनंतरच्या नाट्यमय घडामोडी सुप्रीम कोर्टात सुरुच आहेत. आज कोर्टाने काँग्रेस-जेडीएची हंगामी अध्यक्ष निवडीविरोधाची मागणी अमान्य केली. त्यामुळे के जी बोपय्या हेच हंगामी अध्यक्ष असतील आणि त्यांच्याच देखरेखीखाली आजची बहुमत चाचणी होईल, असं कोर्टाने सांगितलं.

भाजपने ज्येष्ठता डावलून के जी बोपय्या यांची हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. त्याला काँग्रेसने विरोध केला. काँग्रेस-जेडीएसने त्याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र या याचिकेने काँग्रेसचीच कोंडी झाली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram