नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात आधार कार्डवरील सुनावणी संपली, कोर्टाने निर्णय राखून ठेवला
तब्बल ३८ दिवस चाललेली आधार कार्डवरील विक्रमी सुनावणी आज पूर्ण झाली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा निर्णय राखून ठेवला आहे. गेल्या चार महिन्यांपासून या प्रकरणावर मॅरेथॉन सुनावणी सुरु आहे. जानेवारी महिन्यात सुरु झालेली ही सुनावणी तब्बल ३८ दिवस सुरु राहिली. इतके दिवस सुरु राहिलेली आतापर्यंतचं हे दुसरं प्रकरण आहे. यापूर्वी १९७० मध्ये केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार प्रकरणाची सुनावणी तब्बल पाच महिने चालली होती.