नवी दिल्ली: सरन्यायाधीश दीपक मिश्राही पत्रकार परिषद घेणार
Continues below advertisement
गेल्या काही महिन्यांपासून सुप्रीम कोर्टाचं प्रशासन नीट काम करत नाही. त्याची वारंवार तक्रार आम्ही मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्याकडे केली. मात्र त्याचा उपयोग झाला नाही, असा आरोप न्यायमूर्ती चेलमेश्वर यांच्यासह तीन न्यायमूर्तींनी केला आहे.
तसंच सशक्त आणि बळकट लोकशाहीसाठी आम्ही आवाज उठवणं आपलं कर्तव्य समजतो. 10 वर्षांनी आम्ही आमचा आत्मा विकला होता, असं कुणी म्हणू नये यासाठी आम्ही पुढं आल्याचंही त्यांनी म्हटलंय.
यावेळी न्यायमूर्ती चेलमेश्वर यांच्यासोबत न्यायमूर्ती जोसेफ कुरियन, रंजन गोगोई, मदन लोकूरही उपस्थित होते.