Karnataka Crisis | बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा : सुप्रीम कोर्ट | ABP Majha
Continues below advertisement
कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामींना सुप्रीम कोर्टानं एक प्रकारे धक्काच दिला आहे. कर्नाटकातील 15 बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर विधानसभा अध्यक्षांनीच निर्णय घ्यायचा आहे. मात्र, विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयापर्यंत बंडखोर आमदारांना विश्वासदर्शक मत देण्यासाठी बळजबरी करता येणार नाही, असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय. तरी, उद्या कुमारस्वामी सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करायचं आहे. तरी पक्षांनी व्हीप काढून देखील या आमदारांना विधानसभेत उपस्थित राहण्याची जबरदस्ती करता येणार नाही, हा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. 15 बंडखोर आमदारांच्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिला आहे.
Continues below advertisement