नवी दिल्ली : इच्छा मरणाला सशर्त परवानगी: सुप्रीम कोर्ट

Continues below advertisement

इच्छा मरणाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. कोर्टाने इच्छा मरणाला सशर्त परवानगी दिली आहे. सन्मानाने जगणं जसा मूलभूत अधिकार आहे, तसाच अधिकार मृत्यूबाबतही आहे, असं कोर्टाने नमूद केलं. या अधिकाराचा गैरवापर होऊ नये यासाठी कोर्टाने मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. अंथरुणाला खिळलेले अर्थात जे मरणासन्न आहेत, अशा व्यक्तींना त्यांच्या इच्छेविरुद्ध व्हेंटिलेटरवर ठेवू नये. जर त्यांनी इच्छा मरणाची मागणी केली, तर तत्कालिन परिस्थिती पाहून त्याबाबत निर्णय होऊ शकतो, हे आजच्या निकालावरुन स्पष्ट झालं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram