लंडन : जेव्हा सनी आणि डिंपल एकमेकांचा हात घट्ट पकडून बसतात...

Continues below advertisement
बॉलिवूड, अफेअर्स आणि गॉसिप्स हे अजोड नातं आहे. मात्र काही जुनी अफेअर्स अनेक वर्षानंतर अजूनही ताजीतवानी आणि जिवंत आहेत. याचंच ताजं आणि जिवंत उदाहरण म्हणजे डिंपल कपाडिया आणि सनी देओलचा यूट्यूबवर व्हायरल झालेला व्हिडिओ. लंडनमध्ये एका बसस्टॉपवर डिंपल आणि सनी हातामध्ये घट्ट हात घेऊन बसलेले दिसत आहेत. दोघेही एकदम रिलॅक्स मूडमध्ये आहेत. डिंपलच्या हातात असणारी सिगरेट तिचा रिलॅक्स मूड स्पष्टपणे सांगते. सनी आणि डिंपलचं नातं तब्बल 11 वर्ष जुनं आहे. दोघंही प्रसिद्धीच्या शिखरावर असताना त्यांच्या नात्याच्या चर्चा चांगल्याच चर्चिल्या जायच्या. आता त्या चर्चांना पुन्हा कंठ फुटला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram