जम्मू काश्मीर : जैश-ए-मोहम्मदचा लष्करी तळावर हल्ला, एका दहशतवाद्याचा खात्मा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Feb 2018 11:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जम्मू-पठाणकोट मार्गावर असललेल्या 36 आर्मी ब्रिगेडच्या तळावर अतिरेक्यांनी हल्ला चढवला आहे. पहाटे तीनपासून सुरु असलेल्या या चकमकीत आतापर्यंत एका जवानासह एक चिमुकली जखमी झाल्याची माहिती आहे. तर एका अतिरेक्याचा खात्मा करण्यात आला आहे.