आधार कार्ड अनिवार्य करण्याला सुब्रमण्यम स्वामींचाही विरोध
Continues below advertisement
मोदी सरकार बँक खाती, मोबाईल क्रमांक, एलपीजी यांसाठी आधार कार्ड अनिवार्य करत आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी हे आवश्यक असल्याचं सरकार सांगत आहे. तर दुसरीकडे आधार लिंक करण्याला विरोधही होत आहे. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींनीच याला विरोध केला आहे.
पश्चिम बंगाल सरकारने याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारचा हा निर्णय कोणत्याही परिस्थितीत मान्य करणार नसल्याचं सांगितलं आहे. त्यातच आता सुब्रमण्यम स्वामी यांनीही हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचं सांगितलं आहे.
Continues below advertisement