Stunt In Local Train | लोकल ट्रेनमध्ये स्टंट करणाऱ्या दोघांना अटक | मुंबई | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईच्या हार्बर लोकल मध्ये चेंबूर आणि वडाळा स्थानकांदरम्यान लोकल ट्रेनमध्ये स्टंट करणाऱ्या दोघांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद मोसीन असे यातील स्टंट करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यासह त्याचा एक मित्र देखील होता. हे स्टंट करीत असताना वडाळा लोहमार्ग पोलिसांचा एक हवालदार या डब्ब्यात होता.त्याने हा स्टंट मोबाईल मध्ये कैद केला आणि या तरुणाला रोखून त्याला वडाळा स्थानकात त्याला उतरवले आणि त्याला वडाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.लोहमार्ग पोलीस , रेल्वे सुरक्षा बल वारंवार जनजागृती करून देखील याचा या स्टंटबाजांवर कोणताही परिणाम होत नसल्याचे समोर येत आहे.