Fake stone story | दहा वर्षाच्या मुलीच्या डोळ्यातून खडे निघाले? | जळगाव | ABP Majha
एका 10 वर्षाच्या मुलीच्या डोळ्यातून वारंवार खडे निघत असल्याच्या घटनेत तथ्य नसल्याचा दावा नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी केला आहे. जळगावात एका 10 वर्षाच्या मुलीच्या डोळ्यातून 2 ते 3 दिवसांपासून खडे निघत असल्याचा दावा त्या मुलीच्या पालकांनी केला आहे. त्यामुळे या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातल्या पिलखोड गावातली ही घटना आहे. मात्र अशा प्रकारे डोळ्यातून खडे निघत नाहीत, तो एक मानसिक आजार आहे असा दावा डॉ. लहाने यांनी केला आहे.