मुंबई : राज्यभरात वन महोत्सवास सुरुवात, 13 कोटी वृक्ष लागवडीचा सरकारचा संकल्प

Continues below advertisement
राज्य सरकारनं यंदा १३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प केला आहे. कल्याण तालुक्य़ातल्या वरप गावात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. चित्रपट निर्माते सुभाष घई यांचीही याला प्रमुख उपस्थिती होती.  मागच्या वर्षी राज्यभरात १ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला होता. तिकडे नागपूरातही वनविभागाच्या पुढाकारानं वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. गोरेवाडा इथल्य़ा वनविभागाच्या बायोपार्कमध्ये ४२० झाडं लावून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही उपस्थिती होती. वन विभागाच्या पुढाकाराने येत्या एका महिन्यात नागपूर जिल्ह्यात ७ हजार ५७८ ठिकाणी एकूण ४३ लाख ५० हजार रोपं लावली जाणार आहेत. तिकडे सांगलीमध्येही मिरज तालुक्यातील दंडोबा डोंगरावर वृक्षलागवड मोहिमेंतर्गत वृक्ष लागवडीस प्रारंभ करण्यात आला. राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याहस्ते या वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पुढील एक महिन्यात जिल्ह्यात 29 लाख 33 हजार वृक्ष लागवड केली जाणार आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram