मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा फटका, शेतीचं मोठं नुकसान

Continues below advertisement
सध्या राज्यातल्या बहुतांश भागात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावलीए,.. नाशिक, मनमाड, पिंपरीत पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय...
नाशिकच्या ग्रामीण भागात मान्सूनपूर्व पावसाचा जोरदार तडाखा बसलाय... येवला, सिन्नर भागात वादळीवाऱ्यासह झालेल्या मुसळधार पासवसाने कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय...शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करुन उभारलेले शेडनेट जमीनदोस्त झालेत... शेडनेटमधील रोपवाटीका, शिमला मिरचीचे पीक यांचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालंय...
तर सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावात घरांवरचे पत्रे अक्षरशा उडून गेलेत... त्यामुळे अनेक कुटुंबांचा संसार उघड्यावर पडलाय.... पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाचा मोठा फटका बसलाय... शेतीसह अनेक वाहनांचं नुकसान झालंय.. तर होर्डिंग अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झालाय... तिक़डे मनमाडच्या येवला तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसानं जोरदार हजेरी लावलीए... तालुक्यातील एरंडगाव, नेऊरगाव, मुखेड या गावात वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय... तर रत्नागिरी आणि चिपळूण परिसरात पावसाच्या सरी कोसळल्यात तर तिकडे औरंगाबादमध्येहीशहरी भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली.. पावसामुळे उकाड्यापासून लोकांना थोडासा दिलासा मिळालाय...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram