
मुंबई : एसबीआयचं गृह आणि वाहन कर्ज आणखी स्वस्त
Continues below advertisement
स्टेट बँक ऑफ इंडियाने व्याज दरात घट केली आहे. एसबीआयने गृह कर्ज आणि वाहन कर्जावरील व्याज दरात ०.०५ टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे गृह कर्ज हे ८.३५ टक्क्यांवरुन आता ८.३० टक्के इतकं झालं आहे. याच पद्धतीने वाहन कर्जाचे व्याजदर हे ८.७५ टक्क्यांवरुन घटून ८.७० टक्के झालं आहे.
Continues below advertisement