न्यूयॉर्क : वर्णद्वेषाविरोधात अमेरिकेत 'स्टारबक्स'ची मोहीम
Continues below advertisement
अमेरिकेमध्ये एकीकडे वर्णद्वेषाच्या घटना वारंवार घडत असताना स्टारबक्स या प्रसिद्ध आऊटलेटने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी अमेरिकेतील जवळपास आठ हजार दुकानं बंद होती. यामागचं कारण कोणतं आंदोलन नव्हतं. तर त्यांच्या कर्मचाऱ्यांना एक विशेष ट्रेनिंग देणं होतं. वर्षद्वाषामुळे तणाव आल्यास त्यातून कसं बाहेर पडायचं या विषयावर स्टारबक्सने त्यांच्या कर्मचाऱ्यांना विशेष ट्रेनिंग दिलं. यामध्ये एक लाख 75 हजार कर्मचारी सहभागी झाले होते. एकीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा वर्णद्वेषी विधानं केल्याची अमेरिक्सनची भावना आहे. अशा पार्श्वभूमीवर एक दिवसाचा व्यवसाय बंद ठेवून कर्मचाऱ्यांना दिलेल्या या ट्रेनिंग्सचं अमेरिकन्स स्वागत करत आहे.
Continues below advertisement