मुंबई | एसटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट
एसटी महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली. एसटी कर्मचाऱ्यांना 2500 रुपये तर अधिकाऱ्यांना 5000 रुपये दिवाळी भेट मिळणार आहे. याशिवाय एसटी अधिकाऱ्यांना 10 टक्के इतकी अंतरीम वेतनवाढ देण्याचा तसेच एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला