मुंबई : एसटी महामंडळाची किफायतशीर दरात स्लीपर बस, पाच मार्गांवर सेवा सुरु
एसटी महामंडळाने शिवशाही श्रेणीतील 30 बर्थ (2 by 1) असलेली शयनयान (स्लीपर कोच) बस सेवा किफायतशीर तिकीट दरात सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी पहिल्या दहा खाजगी भाडे तत्वावर असलेल्या बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. राज्यातील पाच मार्गांवर या बस धावणार आहेत.