श्रीनगर: ईद दिवशीही श्रीनगरमध्ये दगडफेक
Continues below advertisement
आज ईद असूनही काश्मिरवासियांना मात्र भीतीच्या सावलीत ईद साजरी करावी लागतेय... दहशतवाद्यांच्या गोळीबारात पत्रकार शुजात बुखारी आणि जवान औरंगजेब यांच्या मृत्यूनंतर काश्मीर घाटीमध्ये सध्या भीतीचं आणि तणावाचं वातावरण आहे.. मात्र, याच वातावरणाचं सेलिब्रेशन करत श्रीनगरच्या काही भागांमध्ये तर पाकिस्तान आणि आयसिसच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.. पाकिस्तानचे झेंडे फडकवण्यात आले... त्यामुळे या भागात स्थानिकांकडून पोलिस यंत्रणेवर दगडफेक होतेय.. श्रीनगरमध्ये वातावरण अजूनही तणावपूर्ण असून सुरक्षा यंत्रणांकडून वातावरण नियंत्रित करण्यात येतंय...
Continues below advertisement