श्रीनगर/देहराडून : जम्मू काश्मीरसह मनालीमध्ये बर्फवृष्टी, बर्फामुळे सर्वत्र शुभ्र चादर

जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरमध्ये पुन्हा एकदा बर्फवृष्टीला सुरुवात झालीय. त्यामुळे पर्यटकांमध्ये नवचैतन्य निर्माण झालंय..
सध्या सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे पारा घसरलाय.. तसंच सूर्यनारायणाचं दर्शनही होत नाहीये.. या बर्फवृष्टीचा पर्यटक आणि बच्चे कंपनी मनमुराद आनंद घेताना पाहायला मिळाली.. यासोबतच ऐरवी दहशतवाद्यांच्या गोळीबारानं धडाडणार श्रीनगर सध्या शांतीचं प्रतिक असलेल्या शुभ्र रंगानं न्हाऊन निघालंय.. तर तिकडे कुलूमनालीमध्येही बर्फवृष्टी होत आहे.. त्यामुळे पर्यटक सुखावले आहेत..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola