श्रीनगर : पोलिसांवर गोळीबार करुन एक दहशतवादी फरार, दोन पोलीस शहीद
जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील श्री महाराज हरीसिंग हॉस्पिटलवर दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले आहेत, तर एक पोलीस जखमी आहे. तर एक पोलीस जखमी आहे. गोळीबारानंतर एक दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.नवीद जट असं पळून गेलेल्या दहशतवाद्याचं नाव आहे. तर चेकअपसाठी आणलेल्या इतर पाच कैद्यांची पुन्हा एकदा तुरुंगात रवानगी करण्यात आलीय. तो पाकिस्तानचा आहे. पोलिसांच्या अटकेत असलेल्या काही दहशतवाद्यांना मेडिकल चेकअपसाठी हॉस्पिलमध्ये आणलं होतं. त्याचवेळी दोन दहशतवादी आले आणि त्यांनी हा हल्ला केला. हल्ल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी हॉस्पिटलला वेढा टाकला आहे.