मुंबई : श्रीदेवी मृत्यू प्रकरण दुबई सरकारकडून बंद, पार्थिव मुंबईकडे रवाना

Continues below advertisement
अकाली मृत्यूमुळे 'श्रीदेवी' नावाचं वादळ अचानक शमलं, पण त्यानंतर उठलेलं शंका-कुशंकांचं वादळ काही शमण्याचं नाव घेत नव्हतं. अखेर अनेक दावे आणि प्रतिदाव्यांना पूर्णविराम मिळाला आहे. दुबई सरकारने श्रीदेवी मृत्यू प्रकरण बंद केलं आहे.

दुबईतील स्थानिक वेळेनुसार शनिवारी रात्री 11-11.30 च्या सुमारास श्रीदेवी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर तीन दिवसांपासून मायदेशी परतण्याच्या प्रतिक्षेत असलेलं श्रीदेवींचं पार्थिव अखेर खासगी विमानातून भारताकडे रवाना झालं.

श्रीदेवींच्या मृत्यूनंतर निर्माण झालेलं संशयाचं धुकंही विरलं आहे. हा घातपात नसून बाथटबमध्ये अपघाताने बुडूनच श्रीदेवींचा मृत्यू झाल्याचं अहवालात स्पष्ट झालं. श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांनाही क्लीन चिट मिळाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram