कोलंबो : श्रीलंकेत दहा दिवसांची आणीबाणी जाहीर, बौद्ध-मुस्लीम वादामुळे सरकारचा निर्णय
Continues below advertisement
टी-20 तिरंगी मालिकेतील पहिला सामना सुरु होण्यापूर्वी श्रीलंकेतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. श्रीलंकेत १० दिवसांच्या आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे.
श्रीलंकेच्या कँडी भागात बौद्ध आणि मुस्लिम समुदायातील वादाच्या पार्श्वभूमीवर ही आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
श्रीलंकेत वर्षभरापासून या दोन समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण झाला आहे. पण गेल्या काही दिवसांपासून येथील हिंसाचार प्रचंड वाढला आहे. त्यामुळे कँडी भागातील हिंसाचार इतर भागात पसरु नये यासाठी संपूर्ण देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय आज श्रीलंकेच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे.