ICC T20 WC 2021 : ट्वेन्टी 20 विश्वचषकाचा मानकरी कोण? ऑस्ट्रेलिया की न्यूझीलंड?
ट्वेन्टी ट्वेन्टीच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना अजूनही विश्वचषकाची प्रतीक्षा आहे. ऑस्ट्रेलिया एकदा-दोनदा नाही, तर पाचवेळा वन डेचा विश्वचषक जिंकला आहे. न्यूझीलंडला 2019 साली वन डेच्या विश्वचषकानं थोडक्यात हुलकावणी दिली होती. त्यामुळं ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आज ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकावर नाव कोरण्याच्या इराद्यानंच दुबईच्या रणांगणात उतरतील. पाहूयात क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांचा थेट दुबईतून रिपोर्ट.