कोण होणार टी20 विश्वचषकाचा नवा मानकरी? Austrailia VS New Zealand संघांत अंतिम लढत
Continues below advertisement
T20 WC 2021 Final Match: टी-20 विश्वचषक 2021 च्या अंतिम फेरीत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया (NZ Vs AUS) एकमेकांशी भिडणार आहेत. दोन्ही संघाकडं आजचा सामना जिंकून टी-20 विश्वचषक 2021 चा खिताब जिंकण्याची संधी उपलब्ध आहे. ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आरोन फिंच (Aaron Finch) संभाळत आहे. तर, न्यूझीलंडच्या संघाचं नेतृत्व केन विल्यमसन (Kane Williamson) करीत आहे. आरोन फिंच आणि केन विल्यमसन यांच्या नेतृत्वाखाली हे दोन्ही संघ जेतेपदापासून केवळ एक पाऊल दूर आहेत. न्यूझीलंडनं उपांत्य फेरीत इंग्लंडचा तर, ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा पराभव करून अंतिम फेरीत धडक दिलीय.
Continues below advertisement