Wrestlers Protest : भारतीय कुस्ती महासंघ बरखास्तीचा इशारा; जागतिक कुस्ती महासंघाने घेतली दखल
abp majha web team
Updated at:
31 May 2023 09:02 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे.. मात्र या आंदोलनाची अजूनही केंद्र सरकारनं दखल घेतलेली नाही.. मात्र जागतिक कुस्ती महासंघाने याची दखल घेत भारतीय कुस्ती महासंघटच बरखास्त करण्याचा निर्णय घेतलाय.. कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेऊन हीन वागणूक देणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक पद्धतीनं चौकशी केली जावी. त्याचबरोबर 45 दिवसांत कुस्तीगीर महासंघाची नव्याने निवडणूक घ्यावी, नाहीतर भारतीय कुस्तीगीर महासंघ बरखास्त केली जाईल, असा इशारा जागतिक कुस्ती महासंघाने दिलाय..