T20 World Cup : T20 विश्वचषकासाठी दुखापतग्रस्त Jasprit Bumrah ऐवजी Mohammed Shami ला संधी

T20 World Cup : ऑस्ट्रेलियातल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकासाठी भारतीय संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा समावेश करण्यात आला आहे. दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरानं भारताच्या विश्वचषक संघातून आधीच माघार घेतली आहे. त्यामुळं बुमराऐवजी शमीचा भारताच्या ट्वेन्टी ट्वेन्टी संघात समावेश करण्यात आला आहे. शमी लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होणार असून, ब्रिस्बेन मुक्कामात तो टीम इंडियात सामील होईल. महत्त्वाचं म्हणजे अष्टपैलू शार्दूल ठाकूर आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांनाही राखीव खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाठवण्यात येणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola