Virat Kohli Fan Stab Rohit Sharma Supporter : 'रोहित'च्या समर्थकाची 'विराट'च्या चाहत्याकडून हत्या

Continues below advertisement

भारतात क्रिकेट जणू धर्म बनलाय आणि भारतीय क्रिकेटपटूंची क्रेझ सर्वाधिक आहे.. क्रिकेटपटूंवर चाहते जितकं प्रेम करतात तितकंच त्यांना ट्रोलही करतात.. भारतात रोहित शर्मा आणि विराट कोहली या क्रिकेटपटूंवर जीव ओवाळून टाकणारे अनेक चाहते आहेत. मात्र आपल्या लाडक्या क्रिकेटपटूच्या प्रेमापोटी एकाने दुसऱ्या एका क्रिकेट चाहत्याचा जीव घेतलाय.. विराटच्या चाहत्याने रोहितच्या चाहत्याची डोक्यात बॅट मारुन हत्या केलीय.. तामिळनाडूच्या अरियालूर भागात ही धक्कादायक घटना घडलीय..  रोहित शर्माचा चाहता विग्नेश आणि विराटचा चाहता धर्मराज मल्लूर क्रिकेटबाबत चर्चा करत होते. दोघांनीही मद्यसेवन केलं होतं अशी माहिती मिळतेय.. विग्नेश हा रोहितच्या मुंबई इंडियन्स संघाचं तर धर्मराज हा आरसीबीचं समर्थन करत होता. यावेळी दोघांमध्ये वाद झाला.. विग्नेशनं  आरसीबी संघाची टिंगलटवाळी केल्याच्या वादातून ही घटना घडल्याचं बोललं जातंय. या प्रकरणी पोलिसांनी धर्मराजला अटक केलीय.. मात्र या घटनेचे सोशल मीडियावरही पडसाद उमटतायत.. ट्विटरवर अरेस्ट कोहली हॅशटॅग ट्रेंड होतोय,

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram