Suryakumar Yadav T20 Captain : मुंबईचा सूर्यकुमार यादव भारताच्या 20-20 संघाचा कर्णधार

Continues below advertisement

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) भारताच्या श्रीलंका (IND vs SL) दौऱ्याबाबत मोठी घोषणा केली आहे. भारताच्या श्रीलंका दौऱ्यासाठी टी 20 संघ आणि वनडे संघ जाहीर करण्यात आला. एकदिवसीय मालिकेचं नेतृत्त्व अपेक्षेप्रमाणं रोहित शर्माकडे गेलं आहे. या संघात श्रेयस अय्यरला संधी मिळाली आहे. दुसरीकडे रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली, रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानं टीम इंडियाला सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) रुपात नवा कॅप्टन मिळाला आहे.  हार्दिक पांड्याचं नाव पिछाडीवर पडून सूर्यकुमार यादवच्या नावाला निवड समितीनं कर्णधारपदासाठी पसंती दिली. 

हार्दिकचं नाव शर्यतीत पण सूर्यानं बाजी मारली

हार्दिक पांड्यानं टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचं उपकर्णधारपद भूषवलं होतं. हार्दिक पांड्याचं नाव रोहित शर्माच्या टी 20 मधील निवृत्तीनंतर चर्चेत होतं. रोहित शर्मानंतर टी 20 मध्ये कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे जाईल अशी शक्यता असताना सूर्यकुमार यादवचं नाव चर्चेत आलं. निवड समितीनं देखील सूर्यकुमार यादवच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.  यामुळं हार्दिक पांड्याला निवड समितीनं का नेतृत्त्वाची संधी दिली नाही अशा चर्चा सुरु आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram