ICC T20 WC 2021 : मुख्य प्रशिक्षक नात्यानं रवी शास्त्री तर कर्णधार नात्यानं विराटसाठी आज खास दिवस
ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात टीम इंडियाचा अखेरचा साखळी सामना आज खेळवण्यात येईल. भारत आणि नामिबिया संघांत आज होणारा सामना ही ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातली निव्वळ एक औपचारिकता असली तरी कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासाठी हा दिवस खास आहे. कारण त्यांच्यासाठी टीम इंडियाच्या संयुक्त जबाबदारीचा हा अखेरचा दिवस आहे.