ICC T20 WC 2021 India vs Namibia : ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात आज टीम इंडियाचा 'औपचारिक' सामना...
ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात टीम इंडियाचा अखेरचा साखळी सामना आज खेळवण्यात येईल. भारत-नामिबिया संघांमधला हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येईल. न्यूझीलंडनं काल अफगाणिस्तानला हरवून पाकिस्तानपाठोपाठ सेमी फायनलमधलं आपलं स्थान पक्क केलं. त्यामुळं भारत-नामिबिया सामना हा औपचारिक स्वरुपाचा असणार आहे. विशेष म्हणजे ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांचा कर्णधार या नात्यानं विराट कोहलीचा तर, टीम इंडिया मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांचा हा अखेरचा सामना असेल. त्यामुळं हा सामना जिंकून रवी शास्त्री यांना विजयी निरोप देण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहिल.